कुमार. आर्यन जाधव वय वर्षे (१४) याच्या याच्या लिव्हर प्रत्यारोपन या खर्चिक व अवघड शस्त्रक्रियेसाठी… त्याचे वडिल श्री. शिवराज जाधव, वलवण (कोयना पुनर्वसीत नवे गाव ) यांस रुपये,१,३७,०००/- (एक लाख सदतीस हजार) रकमेचा मदतनिधी धनादेश स्वराज्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मंगळवार दि. १ ऑगस्ट २०२३ रोजी ग्लोबल हॉस्पिटल, परळ, मुंबई येथे सुपुर्द करण्यात आला. अशा प्रकारे वैद्यकिय क्षेत्रात समाजबांधवाच्या अतिषय अवघड प्रसंगी सामाजिक दायित्व राखण्याचे कार्य स्वराज फाउंडेशनकडुन घडले जे काही प्रमाणात वेदना क्षमवुन गेले.