सौ.राजश्री संतोष शिंदे, वय वर्षे २८, गाव-निपाणी मु-हा, तालुका जावली. या भगीणीचे कर्करोगाच्या आजारावरील ऑपरेशन कराड येथे नुकतेच यशस्वी झाले. संतोष शिंदे व त्यांची पत्नी दोघेही जेमतेम शिकले आहेत तसेच त्यांना ३ मुली असून एक ७ वर्ष, एक ४ वर्ष आणि सगळ्यात छोटी मुलगी अवघी १ वर्षाची आहे. संतोष शिंदे हे ड्रायव्हिंग ची नोकरी करून प्रपंच सांभाळत आहेत. आई वडील नाहीत पत्नी एकमेव आधार आहे त्यांच्या मुलांना त्यांच्या शिवाय कोणीही नाही. या परिवाराच्या आर्थिक परिस्थितीचा, विनंतीचा विचार करुन स्वराज्य फाउंडेशनच्या मार्फत या भगिणीसाठी रुपये. १५०००/- (पंधरा हजार ) वैद्यकिय मदत स्वरुपात देण्यात आले.
ईश्वर सौ.राजश्री यांस पुर्णत: या आजारातुन मुक्त करो, व त्यांच्या मुलींना व परिवाराला त्यांची अखंड साथ लाभो हि मनापासुन प्रार्थणा !