श्री काळेश्वरी मित्र मंडळ मुंबई सावरी व ग्रामस्थ मंडळ सावरी, जि.सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. २ जुलै २०२३ रोजी सावरी येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी कलमी हापूस आंब्याची रोपे ग्रामस्थांना वाटण्यात आली.
या उपक्रमासाठी स्वराज्य फाउंडेशनने आर्थिक सहाय्य करुन पर्यावरणाचा समतोल राखण्याकामी सावरी ग्रामस्थांना व लगतच्या गावांनाही प्रोत्साहन दिले. या वृक्षारोपन कार्यामध्ये समस्त सावरी ग्रामस्थ व मुंबईकर एकत्र आले होते तो स्तुत्य प्रसंग !