April 2024

देणगी / Donation, वैद्यकिय मदत / Medical Help

आप्पा पाडा, मालाड येथे प्राथमिक मदत !

आप्पा पाडा, मालाड येथे १३ मार्च २०२३ रोजी लागलेल्या दुर्दैवी अतिभीषण आगीमध्ये उध्वस्त, बेघर झालेल्या नुकसानग्रस्त आपल्या समाजातील १७ कुटुंबाना स्वराज्य फाऊंडेशनच्या वतीने प्रत्येक परिवारास १४ मार्च २०२३ रोजी स्वराज्य फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी भेट देऊन, ताबडतोब १५ मार्च २०२३ रोजी तातडीची मदत म्हणुन प्रतिकुटुंब रुपये ५०००/- (पाच हजार) देण्यात आले. सोबतच काही कुटुंबांना अन्नधान्य, कपडे व […]

इतर / Other

जावळी महाबळेश्वर उत्सव २०२३

महाबळेश्वर,जावली तालुक्यांतील १०५ गाव समाज, कोयना सोळशी कांदाटी बामणोली विभागातील मुले/मुली, स्त्री/पुरुष हौशी कलाकारांना घेवुन रविंद्र नाट्यगृह, प्रभादेवी, मुंबई येथे संपन्न होणारा हा कार्यक्रम म्हणजे समाजाचा सांस्कृतिक मेळावाच होय! या कार्यक्रमास मुंबईस्थित गावावरुन मुंबईमध्ये विस्थापित झालेल्या परिवारांसह गावावरुनही मान्यवर उपस्थित राहतात व हा सोहळा अनुभवतात. या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश म्हणजे आपल्या समाजातील नवनविन कलाकारांच्या आतील

इतर / Other

कौतुक सोहळा

स्वराज्य फाऊंडेशन आयोजित उत्सव जावली महाबळेश्वरचा हा कार्यक्रम रविंद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी दादर येथे आयोजित केला होता. या कार्यक्रमातकलाकारांनी अपार मेहनत घेतली होती. या कलाकारांसाठी कौतुक सोहळा रविवार दि. ०२ एप्रिल २०२३ रोजी गोरेगाव येथे आयोजित केला होता. या कौतुक सोहळ्यात सर्व कलाकार, स्वराज्य कार्यकर्ते, मान्यवर उपस्थित होते.

प्रकल्प / Projects

हळद लागवड

१० मे २०२३ रोजी नाम फाउंडेशन मार्फत महाबळेश्वर/जावली तालुक्यांत झालेल्या शेतीची कामे पाहण्यासाठी सिनेसुपरस्टार आदरणिय, पद्मश्री श्री. नाना पाटेकरसाहेब तळदेव येथे आले होते. त्यांच्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी या विभागाच्या विकासाला सामुदायिक शेतीशिवाय पर्याय नाही असे वारंवार नमुद केले. नाम फाउंडेशनच्या कार्यात स्वराज्य फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांची मेहनत व संपुर्ण नियोजन होते. त्याचबरोबर तळदेव येथील कार्यक्रमाचे नियोजनही स्वराज्य कार्यकर्त्यांच्या

इतर / Other

आधार योजना २०२३

संस्थेने समाजातील अतिगरजु, ज्यांना कसलाही आर्थिक आधार नाही, ज्यांचे जीवनमान अतिशय हालाखीमध्ये आहे, अश्यांसाठी प्रतिमहिना रुपये ५०० /- (पाचशे ) या स्वरुपाची मदत एप्रिल २०२३ या महिन्यापासुन सुरु केली आहे. एप्रिल ते जुलै या महिन्यापर्यंतची मदत सन्माननिय, पद्मश्री. श्री. नाना पाटेकर साहेब यांच्या हस्ते दिनांक १० मे २०२३ रोजी, तळदेव येथे खालील नमुद गरजुंना सुपुर्द

इतर / Other

झाडे लावा… झाडे जगवा

श्री काळेश्वरी मित्र मंडळ मुंबई सावरी व ग्रामस्थ मंडळ सावरी, जि.सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. २ जुलै २०२३ रोजी सावरी येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी कलमी हापूस आंब्याची रोपे ग्रामस्थांना वाटण्यात आली. या उपक्रमासाठी स्वराज्य फाउंडेशनने आर्थिक सहाय्य करुन पर्यावरणाचा समतोल राखण्याकामी सावरी ग्रामस्थांना व लगतच्या गावांनाही प्रोत्साहन दिले. या वृक्षारोपन कार्यामध्ये समस्त सावरी ग्रामस्थ

देणगी / Donation

एक हात मदतीचा… आपल्या माणसांसाठी…

आपल्या संस्थेचे सल्लागार आदरणीय श्री लक्ष्मण दादा जाधवजेसन पॉलिमर यांच्या मदतीने स्वराज्य फाउंडेशन च्या वतीने मंगळवार दि. २६ डिसेंबर २०२३ रोजी वनवासी कल्याण आश्रम शाळा माणगांव, श्रेष्ठ गांधीवादी शिक्षक, समाजसुधारक, प्रतिभावंत लेखक श्री. साने गुरुजी यांच्या वडघर,रायगड येथील राष्टीय स्मारकाला स्वराज्य कार्यकर्त्यांनी भेट देवुन स्मारकासाठी १० सिलिंग फॅन प्रदान केले. साने गुरुजीचे समाजप्रबोधन, साहित्य व देशप्रेमापुढे त्यांच्या स्मारकस्थळी

वैद्यकिय मदत / Medical Help

एक हात मदतीचा… आपल्या माणसांसाठी…

करोना काळात हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेले व स्वतःच्या जीवाची पर्वा न करता धैर्याने रुग्णांची सेवा करणारे श्री. नवनाथजी कदम, रामेघर, जि. सातारा यांच्या खुबा प्रत्यारोपन शस्त्रक्रियेकरिता त्यांच्या हाकेला भावनिक साद देत, त्यांच्या अत्यंत आर्थिक अडचणीवेळी त्यांच्या परिवारावर ओढवलेल्या संकटात स्वराज्य फाउंडेशन बंधुत्वाने त्यांच्यासोबत ठाम उभे राहिले. शस्त्रक्रियेसाठी अडचणीप्रसंगी मदत म्हणुन एका समाजसेवकाला (रुपये ४५०००/-) धनादेश देताना

वैद्यकिय मदत / Medical Help

एक हात मदतीचा… आपल्या माणसांसाठी…

सन्माननिय आयुक्त, आयकर विभाग, मुंबई, यांच्या विनंतीस अनुसरुन त्यांच्या परिचयातील कॅसर पेशंट श्री. संजय जाधव यांना त्यांच्या घरी त्यांची भेट घेवुन स्वराज्य फाउंडेशन कार्यकर्ते, श्री.संजय जाधव व श्री. गोविंद शिंदे यांनी मदतनीधीचा धनादेश दिला.

वैद्यकिय मदत / Medical Help

एक हात मदतीचा… आपल्या माणसांसाठी…

रामेघर गाव सुपुत्र, श्री. नवनाथजी कदम यांच्या दोन्ही पायांच्या खुबा प्रत्यारोपन या महागड्या शस्त्रक्रियेसाठी त्यांच्या भावनिक हाकेला प्रतिसाद देत सामाजिक बंधुत्वाच्या नात्याने खालील दानशुर मान्यवर समाजबांधवांनी स्वराज्य फाउंडेशन च्या माध्यमातुन २४ ऑक्टोबर २०२३ रोजी मदतीचा हात दिला. १) श्री. मानाजीदादा शिंदे. (पाली) मदतनिधी रु. ११०००/-       २) श्री. के. के. शेलार साहेब (अंधारी) ५) स्वराज्य फाउंडेशन संघटना. मदतनिधी रु.

Scroll to Top