जावळी महाबळेश्वर उत्सव २०२३
















महाबळेश्वर,जावली तालुक्यांतील १०५ गाव समाज, कोयना सोळशी कांदाटी बामणोली विभागातील मुले/मुली, स्त्री/पुरुष हौशी कलाकारांना घेवुन रविंद्र नाट्यगृह, प्रभादेवी, मुंबई येथे संपन्न होणारा हा कार्यक्रम म्हणजे समाजाचा सांस्कृतिक मेळावाच होय! या कार्यक्रमास मुंबईस्थित गावावरुन मुंबईमध्ये विस्थापित झालेल्या परिवारांसह गावावरुनही मान्यवर उपस्थित राहतात व हा सोहळा अनुभवतात. या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश म्हणजे आपल्या समाजातील नवनविन कलाकारांच्या आतील सुप्तगुण व्यासपिठावर आणने,त्यांना प्रोत्साहित करणे व कलागुणांना मोठ्या व्यासपिठावर वाव देणे हा आहे. समाजातील नावाजलेल्या प्रतिभावंत कलाकारांच्या मार्गदर्शनाखाली, दिग्दर्शनाने व नैपथ्याने नवनविन संस्कृती जपण्याच्या संकल्पना या कार्यक्रमाच्या माध्यमातुन समाजापुढे मोठ्या उत्साहात सादर होतात, ज्याने कलाकारांचा आत्मविश्वास द्विगुणीत होतो. या निमित्ताने आपल्याच विभागातील कलाकारांच्या कला पाहण्याचा योग, एकमेकांच्या भेटीगाठीचा योग, विचारांच्या आदानप्रदाणीचा योग,व्यवसाय संदर्भात चर्चा करण्याचा योग जुळवण्याचे कार्य स्वराज्य फाउंडेशनच्या उत्सव जावली महाबळेश्वरचा या सांस्कृतिक कार्यक्रमातुन घडते. यामध्ये समाजातीलच कुटुंबांना तिकिटांच्या माध्यमातुन साधारण शुल्क आकारुन प्रवेश दिला जातो. तिकिटांतुन जमा होणारी रक्कम ही कार्यक्रमाच्या खर्चासाठी वापरली जाते व उरलेली साधारण एक ते दिड लाख इतकी रक्कम गावच्या वृद्ध, अपंग निराधार लोकांना स्वराज्य फाउंडेशन आधार योजने अंतर्गत त्यांच्या उदर्निवाहासाठी महिना पेंशनपद्धतीने त्यांच्या खात्यावर जमा करण्यात येते. या कार्यक्रमात भाग घेणा-या कलाकारांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व ट्रॉफी दिली जाते व उपस्थित मान्यवरांना, देणगीदारांना शॉल श्रीफळ न देता पुस्तक भेट म्हणुन दिले जाते. या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगिताने होते व शेवट पसायदानाने केला जातो. यानंतर साधारण १००० प्रेक्षक, १५० कलाकार व ५० कार्यकर्त्यांसाठी अल्पोपहार व त्यादरम्यान कलाकारांच्या प्रशंसेसह, नविन अपेक्षित संकल्प,अपेक्षांसह सर्व आनंदाने व तितक्याच नविन कार्यक्रमाच्या उत्कंठेणे, ज अंतःकरणाने एकमेकांचा पुनश्चः भेटीच्या वचनांवर निरोप घेतात.

Scroll to Top